गड-दुर्ग भटकंती आठवड्ड्यातील सुट्टीतली
Wednesday, 18 May 2022
The inspirational quotes
May you be surrounded by friends and family, and if this is not your lot , may the blessings find you in your solitude.
(Leonard Cohen, singer -songwriter)
I think computer viruses should count as life. I think it says something about human nature that the only form of life we have created so far is purely destructive. We have created life in our own image
(Stephen Hawking, physicist)
Thursday, 16 June 2016
किल्ले राजमाची वर्षा नुभव
पावसाळा सुरुवात झाली, विकेंडला एखाद्या किल्ल्यावर वर्षा ट्रेकींगचा प्लानिग करताय ?मग राजमाचीला आवश्य भेट द्या. मी स्वतः चारवेळा राजमाचीस जाऊन आलो आहे , पण पावसाळ्यातील निसर्ग काही वेगळीच अनुभव देऊन जातो.
राजमाचीस जाण्यासाठी दोन मार्ग आहेत,एक कर्जतवरुन ,कर्जत पश्चिमेस पायी १५ मिनिटांच्या अंतरावर शेयर टम टम स्थानक आहे . तेथून कोंदिवडे गावापर्यंत जाणारी टम टम पकडावी . गावात उतरल्यावर गावातून जाणाऱ्या डांबरी रस्त्याने उल्हास नदीच्या काठाने तासाभराच्या पायपीट नंतर ठाकूरवाडी या पायथाच्या वाडीत यावे .(कोंदिवडे आणि ठाकूरवाडी या वाटे मध्ये थोडीशी वाट सोडून दोन एक अंतरावर पांडव काळींन लेणी पाहू शकता .)
वाडीतून एखादा वाटाड्या घेवून त्याला गडाच्या मळलेल्या वाटेपर्यंत सोबत करायला सांगावी .( अलीकडे वाडीच्या मागे खाजगी फार्म हाउस झाले आहेत, त्यामुळे कुपन आणि बरेचसे खोदकाम झालेले आहे ,वाट चुकण्याचा संभव आहे ,मी दोन वर्षापूर्वी गेलो होतो ,त्या आधी दोनदा जावून आलो होतो तरी मला वाट शोधयाला त्रास झाला होता .)
| २५ जानेवारी २०१३ राजमाची कर्जत मार्गे माझी सौ . मुलगा आणि मी . मळलेली पायवाट |
एकदा का मळलेली वाट पकडली की खड्या चढणीच्या वाटेने तीन साडे -तीन तासात गडाच्या कोकण बाजूकडील पठारावर पोहचतो .
दुसरा मार्ग लोणावळ्याहून तुंगार्ली धरण गाठावे व तेथून रमत गमत ७ ते ८ तासांची निसर्गाच्या सोबतीने सपाट आणि थोड्या फार चढणीच्या पायपीटीनंतर उधेवाडी या गडाच्या पायथाच्या वाडीत पोचतो. येथून तासा भरात प्रत्येकी श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन बालेकिल्ल्यावर जावून दूरवर पसरलेल्या निर्सार्गाचे विलोभनीय नेत्रसुख घेऊन ८ तासांच्या श्रमाचे चीज झाले असा विचार हमखास मनात येतो .
आपल्याला वर्षा ट्रेकींगचा आनंद घेयायचा मग आपण दुसऱ्या मार्गांनी जाण्याचा बेत आखा .
मुंबईवरून बस किवा ट्रेनने लोणावळा गाठावे ,बस स्थानकाजवळून रिक्षा किवा टम टमने तुंगार्ली धरण येथे पायउतार व्हावे . धरणाचे विस्तीर्ण जलाशयाचे नेत्रसुख घावे आणि पुढील पायपिटीला मार्गस्थ व्हावे .
| तुंगार्ली धरण पाणीसाठा |
| नागमोडी उताराच्या रस्त्यावर विसावा मागे खाजगी धरण , उजवीकडून मिलिंद सुर्वे ,समीर सतविडकर ,,बंटी ,गणेशआणि प्रदीप मांजरेकर |
| डाव्या बाजूकडील उल्हास खोरे |
२०-२५ मिनिटांच्या अंतराने सह्याद्रिची भिंत आणि डाव्या बाजूला उल्हास खोऱ्यातील दरी जाते व साय्हाद्रीतून व्हाणारे छोट ओढे नाले मधेच आपली वाट अडवतात आणि आपल्याला त्यात धोडीशी धम्माल करावीशी वाटते
| साय्हाद्रीतून व्हाणारे छोट ओढे नाले |
साधारण आडची तीन तासांच्या एकंदरीत वाटचालीनंतर आपण एका पठारावर येतो . येथे उधेवाडीतील गावकऱ्यांचे छोटेखानी २ ते ३टपरीतील हॉटेल आहेत . आपण जर जेवण आणले नसेल तर येथे तुमच्या जेवणाची सोय होऊ शकते . किवा गरम -गरम चहा आणि ,पिठलं भाकरी यावर तव मारू शकता.
| टपरीतील हॉटेल |
| तबुतील निवास |
| व्ह्याली क्रॉसिंग |
येथे सोबत आणलेल्या जेवणावर ताव मारावा किवा टपरी तील जेवण करून मार्गस्थ व्हावे .
काहीवेळाने आपण एका मोठ्या ओढ्यापाशी पोचतो ,येथे ओढ्यास पाणी जास्त असेल तर ओढा क्रॉस करायचा प्रयत्न करू नका . सह्याद्रीतील रागेतून येणाऱ्या पाण्याचा लोट आपणास तयाच्यासोबत घेऊन जाऊ शकतो . जरी आपण आहोत तेथे पाऊस नसला तरी घाट माथ्यावर पाऊस असल्यास जोराचा पाण्याचा लोंढा येऊ शकतो.खबरदारी म्हणून येथे एक वायर रोप लावला आहे ,पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहून मगच ओढा क्रॉस करा.
| बंटी ,गणेश ,मिलिंद |
| निसर्गाचा आनंद लुटणारे पर्यटक |
| श्री गणपती आणि मारुती |
मंदिरापासून साधारण तास दीड तासाभरात आपण श्रीवर्धन या बालेकिल्याच्या बुरुजाखालील रस्तयावर पोचतो .
| श्रीवर्धन या बालेकिल्ल्याचा बुरुज |
| बुरुजाखालून विरुद्ध दिशेला उल्हास खोऱ्यातील धबधबे |
हया वाटणे सरळ किल्ल्याच्या भिंतीच्या समांतर चालत रहावे अर्धा तासाभरात आपण उढेवाडीमध्ये येउन पोचतो.
मागील फोटोतील बुरुज मागे ठेवून समांतर वाटचाल
|
बहुतेक गावकरी हे राहण्याची व जेवणाची सोय करतात ,सभोवतील जंगल हे भीमाशंकर ह्या आरक्षित अभयारण्यात येत असल्याने त्यांना शेती करण्यास जागा नाही ,त्यामुळॆ पर्यटकांची राहण्याखाण्याची सोय करून ते आपल्या उधरनिर्वाण करतात . आता मोबाइल फोन मुळे आपण आगाऊ फोन करुन आपण आपल्या राहण्याची सोय करू शकता . कारण काही गावकरी नौकरी निमित्त लोणावळा परिसरात येत जात असतात ,तयांच्याद्वारे आपला निरोप हमखास पोचतो.
एकदा का आपली राहण्याची सोय झाली की मस्तपॆकी मागील तलाव आणि समोरील बारमाही पाणी वहाणारे गोमुख असणारे पुरातन मंदिर पहाऊन यावे .
एकदा का आपली राहण्याची सोय झाली की मस्तपॆकी मागील तलाव आणि समोरील बारमाही पाणी वहाणारे गोमुख असणारे पुरातन मंदिर पहाऊन यावे .
| बारमाही पाणी वहाणारे गोमुख |
| मी आणि मिलिंद |
| मी आणि मिलिंद बोट करून दाखवत असलेला बुरुज आपण मघाशी ह्याच बुरुजाखालून आलो |
| मिलिंद आणि गणेश |
सकाळी लवकर उठून पाऊस जास्त नसेल तर श्रीवर्धनला भेट द्यावी आणि वाडीत येउन गरम गरम चहा ,कांदा पोहे ,पिठलं भाकरी असा गरम गरम नाष्टा करून परतीच्या मार्गाला लागावे . आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कर्जतच्या वाटेने चार एक तासात कर्जत किवा आलेल्या मार्गाने सहा सात तासात लोणावळा गाठू शकता .
(येथे मला मुद्दाम नमूद करावशे वाटते की ह्या ट्रेकच्या आधी मी आणि माझा डोंबिवलीतील मित्र परिवाराने (मी फक्त अंबरनाथ येथील ) १९९६-९७ पासून ३० ते ४० ट्रेक केले आहेत हा माझा पहिलाच ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न आहे आणि नेमक्क्या ह्याच ट्रेक मध्ये आमचा मुख्य मित्र अमित सतविडकर हा नव्हता ,आणि केवळ अमित मुळेच माझ्या ट्रेकिंग औढीची तहान मी आयुष्यात भागवु शकलो )
आमचा ग्रुप -अमित सतविडकर ,मिलिंद सुर्वे ,गणेश सुतार ,बंटी( पंकज पवार ) ,मी नितीन कारिते ,निलेश ठोंबरे ,योगेश.
Subscribe to:
Posts (Atom)